इस्रोच्या स्वदेशी बनावटीच्या अंतराळयानाची यशस्वी झेप!

isro
मुंबई: भारतीय अंतराला संशोधन म्हणजेच इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. आज सकाळी या संस्थेच्या पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या आरएलव्ही-टीडी या अंतराळयानाने अवकाशात यशस्वी झेप घेतली. या यानाच्या यशस्वी उड्डाणानाने भारताच्या नावावर आणखी एक सन्मान नोंदवण्यात आला आहे.

इस्रोचे संशोधक गेल्या पाच वर्षांपासून पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे अंतराळयान तयार करण्यासाठी काम करत होते. पहिल्यांदाच असा प्रयत्न इस्रोकडून करण्यात आला आहे. सुमारे ९५ कोटी रूपये खर्च हे अंतराळयान बनवण्यासाठी करण्यात आला. या यानाने श्रीहरीकोटा येथून आज सकाळीच यशस्वी उड्डाण केले.

पुनर्वापर करण्याच्या क्षमतेचे हे आरएलव्ही-टीडी यान असून एखाद्या अंतराळयानाचा पुनर्वापर करण्याची कल्पना विकसित देशांनी सोडली आहे, मात्र, इस्रोने ती प्रत्यक्षात आणली आहे.

Leave a Comment