४ हजार नोक-या देणार अॅपल !

tim-cook
नवी दिल्ली – आता भारतामध्ये आपला विस्तार करण्याचा प्रयत्न इतर देशांमध्ये व्यवसाय कमी झाला म्हणून उभरती अर्थव्यवस्था असणा-या भारताकडे डोळे लावून बसलेल्या अॅपलने नेटाने सुरू केल्यामुळे अॅपलचे सीईओ टिम कूक भारतीय दौ-यावर आले आहेत. त्यांनी हैदराबाद येथे नवीन कार्यालय उघडण्याची घोषणा केली आहे. अॅपलच्या नवीन गुंतवणूक मॅप डेव्हलपेंट सेंटरमुळे काम करण्यास सुलभता येणार असून, यामुळे ४ हजार नवीन नोक-यांची निर्मिती होणार आहे.

कंपनीकडून सध्या यामध्ये किती गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र अॅपल यामध्ये दीड कोटी डॉलर म्हणजे १७० कोटी रुपये गुंतवणूक करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारतामध्ये सध्या अनेक दूरसंचार कंपन्या ४जी सेवा सुरू करण्याच्या तयारीत असल्यामुळे टिम कूक यांची कंपनी त्याचा फायदा घेण्याच्या तयारीत आहे. आम्ही दीर्घकालावधीसाठी देशात गुंतवणूक करत आहोत. आम्ही सर्वात जास्त आयफोनवर लक्ष केंद्रित केले आहे. ती आमच्यासाठी महत्त्वपूर्ण बाब आहे. आयफोनची असणारी वैशिष्टय़े समजून घेण्यासाठी ४जी सेवा आवश्यक आहे, असे कूक यांनी म्हटले आहे.

Leave a Comment