भारतातून परदेशात जाणार्‍या रेल्वे

express
भारत हे जगातील सर्वाधिक मोठे रेल्वे जाळे असलेल्या देशांच्या यादीतील चौथे मोठे राष्ट्र आहे. भारतातली ही सेवा अन्य कांही देशांशीही जोडली गेलेली आहे. भारताचे शेजारी देश असलेले पाकिस्तान, नेपाळ व बांग्लादेश येथे भारतातून रेल्वे सेवा दिली जात आहे.

कोलकाता ते बांग्लादेशची राजधानी ढाका यांच्या दरम्यान मैत्री एक्स्प्रेस ही रेल्वे जाते. या दोन्ही देशांना जोडणारी ही एकमेव रेल्वे अनेक वर्षे बंद होती ती आता पुन्हा सुरू करण्यात आली आहे. आठवड्यातले सहा दिवस ही गाडी जा ये करते. भारत नेपाळ जोडणारी रेल्वे भारतातील रक्सौल पासून ते नेपाळमधील सिरसिया (वीरगंज) पर्यंत जाते. सहा किलोमीटरच्या या रेल्वे मधून फक्त सामानाची नेआण होते. म्हणजे ही मालगाडी आहे. भारतातून या रेल्वेतून निर्यात केली जात असल्याने तिला नेपाळची लाईफलाईन असेही संबोधले जाते.

तिसरी गाडी आहे भारत पाकिस्तान मधली ७०० किमी लांबीचे अंतर तोडणारी समझोता एक्स्प्रेस. ही रेल्वे वाघा बॉर्डर ओलांडून पाकिस्तानात जाते तर थार एक्स्प्रेस ही भारत पाकिस्तान जोडणारी आणखी एक रेल्वे भारताच्या मुनाबाव या अखेरच्या स्टेशनवरून पाकिस्तानात जाते. ही गाडी आठवड्यातून एक दिवस दर शुक्रवारी जाते व त्यासाठी कडक बंदोबस्तही ठेवला जातो.

Leave a Comment