देशातील २४ शाखा बंद करणार एचएसबीसी

hsbc
नवी दिल्ली – भारतामधील आपला व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत दिग्गज बँक एचएसबीसी (हाँगकाँग ऍन्ड शांघाई बँकिंग कॉर्प) आहे. आपल्या ५० मधील २४ शाखांना बँक बंद करणार आहे. या शाखा १४ शहरांमध्ये आहेत. किरकोळ आणि वेल्थ मॅनेजमेंटला ऑनलाईन केल्यामुळे या शाखांची गरज नसल्याचे बँकेचे स्पष्ट केले आहे.

बँकेने हे पाऊल जागतिक स्तरावर आपल्या खर्चात कपात करण्यासाठी उचलले असण्याची शक्यता असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. बँकेने सहा महिन्यापूर्वी भारतातील आपला बँकिंग व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली होती. मात्र त्यावेळी भारताच्या प्राप्तीकर विभागाकडून बँकेची स्विस खात्यामध्ये चौकशी केल्यानंतर कंपनीने हा इशारा दिला आहे.

बँकिंग सध्या मोठय़ा प्रमाणावर ऑनलाईन होत आहे. शाखा बंद झाली तरी लोक ऑनलाईन सुविधेच्या माध्यामतून बँकिंग व्यवहार करत असल्यामुळे बँकेचा खर्च कमी होत आहे. मात्र त्यामुळे रोजगारावर परिणाम होत आहे. बँकेला मागील वर्षात २.५ लाख डॉलरचे नुकसान भारतामध्ये झाले आहे. मागील काही वर्षामध्ये अशियामध्ये भारत बँक क्षेत्रासाठी तिसरे सर्वात जास्त फायदा देणारे मार्केट आहे, असे बँक तज्ञांनी माहिती देताना सांगितले.

सध्या चेन्नई, गुवाहारी, इंदौर, जोधपूर, लखनऊ, लुधियाना, मुंबई, म्हैसूर, नाशिक, पाटना, पुणे, रायपूर, तिरूवंतपूरम, वडोदरा आणि विशाखापट्टनमध्ये एचएसबीसी बँकने आपली एक शाखा, नवी दिल्लीमध्ये दोन आणि कोलकातामध्ये ५ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. येणा-या महिन्यांमध्ये बँक नेटवर्कला एकत्र करण्यात येणार आहे. बँक भारतामध्ये ३३ हजार लोकांना रोजगार देते. या निर्णयामुळे जवळपास १ टक्के कर्मचा-यांवर याचा प्रभाव पडणार असल्याचे बँकेच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.

Leave a Comment