कुवेतच्या वाळवंटात साकारतेय सी सिटी

kuwait
कुवेत भोवती चौफेर पसरलेल्या वाळवंटात समुद्री शहर उभारणीचे काम पूर्णत्वाच्या दिशेने सुरू असून १० किमीवरून समुद्राचे पाणी या शहरासाठी आणले गेले आहे. या शहराला १२४ किमी लांबीच किनाराही निर्माण केला गेला आहे व तेथे बोटींग करता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या शहर उभारणीसाठी किती खर्च आला याची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र २०२० सालापर्यंत या शहरात किमान २० ते २५ हजार लोक राहण्यासाठी येतील. २० देशातील २५०० इंजिनिअर व वर्कर या शहराच्या उभारणीसाठी काम करत आहेत. या शहराची मूळ कल्पना प्रॉपर्टी डेव्हलपर खलिद युसुफ यांची होती. मात्र खाडी युद्ध सुरू झाल्यामुळे ती राबविणे शक्य झाले नव्हते. दरम्यान खलिद यांचा मृत्यू झाला. त्यानंतर २००३ साली त्यांचा मुलगा फवाज याने हे काम सुरू केले. या शहराच्या उभारणीचे ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे समजते.

Leave a Comment