भारताच्या दौ-यावर येणार सत्या नडेला

satya-nadella
नवी दिल्ली – अॅपलचे सीईओ टिम कूक यांच्यानंतर मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेलाही आता या महिना अखेरीस भारताच्या दौ-यावर येणार आहेत. सात महिन्यामध्ये नडेला यांची ही तीसरी भारत भेट आहे. येत्या ३० तारखेस नडेला भारतामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. आपल्या दौ-यादरम्यान नडेला अनेक उद्योजक आणि विकासक यांची भेट घेणार आहेत.

३० मे रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन मायक्रोसॉफ्ट करत आहे. या कार्यक्रमामध्ये तंत्रज्ञान विश्वातील सध्याच्या समस्यांची उकल करण्यासाठी आणि भारतामध्ये बदलत असलेल्या व्यापाराच्या संस्कृतीबाबत चर्चा करण्यात येणार आहे. नाडेला मागील वर्षात डिसेंबरमध्ये भारतामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी स्टार्टअप इन्क्यूबेटर टी हब आणि मायक्रोसॉफ्ट विकास केंद्राला भेट दिली होती.

Leave a Comment