देशाची धर्मनिहाय लोकसंख्या जाहीर

popullation
नवी दिल्ली: २०११साली धर्मावर आधारित झालेल्या जनगणनेचे आकडे जाहीर करण्यात आले असून देशात हिंदूंची संख्या या आकडेवारीनुसार ७९.८ टक्के तर हिंदू घरांची संख्या ही ८१ टक्के इतकी असून सुमारे २०.२४ कोटी हिंदू कुटुंब देशात राहतात.

मुस्लिम घरांची देशातील संख्या १२.५ टक्के तर लोकसंख्येच्या तुलनेत देशाच्या १४.२३ टक्के मुस्लिम आहेत. म्हणजेच देशात ३.१२ कोटी मुस्लिम कुटुंब राहतात. याआधी धर्मनिहाय लोकसंख्या जाहीर करण्यावरुन बराच वाद झाला होता. हिंदुत्ववादी संघटनांनी हिंदूंची लोकसंख्या वेगाने कमी होत असल्याचा दावा केला होता. मात्र गेल्या दहा वर्षात सर्वच धर्मात सरासरी समान वाढ झाली आहे. जनगणनेनुसार देशात २४.८८ कोटी कुटुंब आहेत. त्यामध्ये २०.२४ कोटी हिंदू, ३.१२ कोटी मुस्लिम, ६३ लाख ख्रिश्चन, ४१ लाख शीख आणि १९ लाख जैन कुटुंबांचा समावेश आहे.