चेहर्‍यावरची चरबी या उपायांनी करा कमी

face
डबल चिन म्हणजे डबल हनुवटी, जरा जादाच गोबरे दिसणारे गाल हे सुंदरतेला गालबोट मानले जातात. जाड लोकांना ही समस्या नेहमीच येते इतकेच नव्हे तर बाकी शरीरयष्टी सडपातळ असूनही कांही जणांचा चेहरा गुबगुबीत दिसतो त्यामागे फेशियल फॅट हे कारण असते. शरीराच्या अन्य भागावरची चरबी कांही खास डिझाईनचे, रंगाचे, प्रिटचे कपडे वापरून झाकता येते मात्र चेहर्‍यावरची चरबी लपविणे अशक्य असते.

शरीरशास्त्रज्ञांच्या मते शरीरावर पोट, कंबर यांच्यानंतर चरबी साठते ती चेहर्‍यावर. कारण चेहर्‍याच्या आसपासचा भाग नरम असते त्यामुळे तेथे लवकर फॅट जमा होते. त्याचबरोबर मद्यसेवन, डिहायड्रेशन, अपुरी झोप, अतिरिक्त जाडी, आहार यांच्यातील असंतुलनामुळेही चेहरा सुजतो. थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात बिघाड झाला तरी चेहर्‍यावर सूज दिसते. यातून मुक्ती मिळविण्यासाठी कांही सोपे बदल उपयुक्त ठरतात.

face1
सर्वात पहिला बदल आहारात करावा लागतो. सप्लीमेंटऐवजी दूध, पनीर, दही नियमाने खाल्ल्यास कॅल्शियम पूर्तता होते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते व हाडे मजबूत झाली की फॅटही कमी होऊ लागते. दिवसात तीन वेगवेगळी फळे सेवनही उपयुक्त ठरते. पाणी भरपूर प्रमाणात पिणे चरबी घटविण्यासाठी उपयुक्त ठरते. पाणी भरपूर प्यायल्याने शरीरात निर्माण झालेली विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात त्याचबरोबर वसाही कमी होते. वसा ही एकप्रकारची चरबीच आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत घाम जास्त येतो. घामावाटे मीठ बाहेर टाकले जात असले तरी अशावेळीही मीठाचे सेवन कमी करणे आवश्यक असते.सॅलड खाताना वरून कच्चे मीठ न घेणे फायदेशीर ठरते. जंक फूडमध्ये सोङियमचे प्रमाण जास्त असते त्यापासून दूर राहणेही फायद्याचेच. त्याचबरोबर फेशियल मसाज योग्य प्रकारे केला तर चेहर्‍याचे रक्ताभिसरण वाढते व मांसपेशी मजबूत होतात व फॅट बर्न होते. झोप पुरेशी व पूर्ण घेतल्यानेही चेहर्‍यावरची सूज किंवा अतिरिक्त चरबी कमी होण्यास हातभार लागतो. व्यायामाला येथेही पर्याय नाहीच. चेहर्‍यासाठीचे खास व्यायाम उपयुक्त ठरतात. त्याचबरोबर दारू सेवनानुळे शरीर डिहायड्रेड होते व त्याचाही परिणाम चेहरा सुजलेला दिसतो.

या सर्वात महत्त्वाचे असते ते चेहर्‍यावरचे हसू कायम ठेवणे. तुमची फेस व्हॅल्यू वाढविणारा हा एकमात्र फ्री ऑफ कॉस्ट उपाय आहे.

Leave a Comment