आता महाराष्ट्र, गोव्यात व्होडाफोनची सुपरनेट सेवा

vodafone
पुणे – आता महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळात व्होडाफोन सुपरनेट ही सेवा सुरू होत असल्याची घोषणा भारतातील आघाडीची दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी व्होडाफोन इंडियाकडून करण्यात आली. याचा लाभ महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळातील १.८५ कोटींहून अधिक ग्राहकांना होणार आहे.

व्होडाफोनने महाराष्ट्र आणि गोव्यात २५०० हून अधिक सेल साईट्स व्होडाफोन सुपरनेटसाठी उभारून या परिमंडळातील नेटवर्क अधिक सक्षम केले आहे. व्होडाफोन सुपरनेट थ्री-जी ही सेवा आता ५५२ शहरे आणि ८९३४ गावांत उपलब्ध आहे. परिमंडळाचे व्यवसाय प्रमुख आशिष चंद्रा म्हणाले, ग्रामीण भागातील स्मार्ट फोन वापरणा-यांच्या गरजा भागविण्यासाठी विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचीही उभारणी केली आहे. वेगाबरोबरच सुविहित नेटवर्क अनुभव पुरवणे, हा यामागचा उद्देश आहे.

Leave a Comment