मारुतीच्या एस-क्रॉसचा ‘ब्रेक फेल’, परत मागवल्या कार !

maruti
नवी दिल्ली : आपल्या २० हजार ४२७ ‘एस-क्रॉस’ कार मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या भारतातील सर्वात मोठ्या कार मेकर कंपनीने परत मागवल्या असून या कारमधील ब्रेकचे पार्ट्स खराब असल्याची माहिती मिळते आहे.

यात एप्रिल २०१५ ते १२ फेब्रुवारी २०१६ दरम्यान तयार केलेल्या कार्सचा समावेश आहे. DDiS 320 आणि DDiS 200 या दोन्ही व्हेरिएंटच्या गाड्या ‘एस-क्रॉस’च्या सर्व्हिस कॅम्पेनसाठी परत मागवल्या जाणार आहेत, अशी माहिती मारुती सुझुकीकडून देण्यात आली आहे. मारुती सुझुकीकडून डिलर्सशी संपर्क साधून गाड्या मागवल्या जाणार आहेत. ब्रेकच्या पार्ट्समध्ये त्रुटी असून, रिप्लेसमेंटसाठी कोणत्याही प्रकारची रक्कम आकारली जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांना याचा आर्थिक फटका बसणार नाही.

मारुती सुझुकी कंपनीच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्व्हिस कॅम्पेन ऑटोमोबाईल कंपनीकडून आयोजित केले असून, गाड्यांमधील त्रुटींचा शोध यादरम्यान घेतला जाणार आहे. यात जाणाऱ्या वेळामुळे ग्राहकांना काही काळ त्रास सहन करावा लागणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एस-क्रॉस गाडीची ८ लाख ३४ हजार रुपये सुरुवातीची किंमत होती. मात्र, आता दोन डिझेल इंजिन व्हेरिएंटही बाजारात उपलब्ध आहेत.

Leave a Comment