अॅपलचे मॅप विकास कार्यालय हैद्राबादमध्ये

hydrabad
हैद्राबाद- भारताच्या दौर्‍यावर आलेले अॅपलचे सीईओ टीम कुक यांनी गुरूवारी हैद्राबाद मध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते अॅपलच्या नवीन विकास संशोधन कार्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी तेलंगणाचे माहिती तंत्रज्ञान मंत्री के.टी. रामाराव हेही हजर होते. अॅपलचे अमेरिकेबाहेरचे हे पहिलेच संशोधन विकास कार्यालय आहे. या मुळे चार हजार जणांना नोकरी मिळू शकणार आहे.

अॅपलच्या या कार्यालयात आयफोन, आयपॅड, मॅप, अॅपल वॉच सारख्या उत्पादनांसाठी मॅप डेव्हलपिंग केले जाणार आहे. अॅपल सातत्याने त्यांच्या उत्पादनांसाठी मॅप मध्ेम नवी फिचर्स डेव्हलप करतो आहे. त्यात थ्रीडी न्यूज, फ्लायओव्हर सारखी उपयुक्त फिचर्सही आहेत. आजच्या घडीला अॅपलने जगातील ३०० पेक्षा अधिक शहरांसाठी मॅप दिले आहेत.

Leave a Comment