हार्ले डेव्हीडसनची दमदार सॉफ्टेल स्लीम एस बाईक

harley
हार्ले डेव्हीडसनच्या ताकद आणि स्टाईल यांचा सुंदर संगम असलेल्या सॉफटेल स्लीम एस २०१६ ला अमेरिकेत चांगलीच लोकप्रियता लाभली आहे. आकर्षक शानदार लूकच्या या बाईकची पुढची बाजू रूंद असली तरी मागची बाजू स्लीम आहे. या बाईकच्या इंधन टाकीची क्षमता १९ लिटर ची आहे व ही बाईक लिटरला १८ किमीचे अॅव्हरेज देते. या बाईकची किंमत अमेरिकेत १८४९८ डॉलर्स म्हणजे १२.५ लाख रूपयांना आहे.

या बाईकचे खास वैशिष्ठ म्हणजे तिला दिले गेलले १८०२ सीसीचे दमदार स्क्रीमिंग ईगल, एअर कूल्ड, ट्विन कॅम ११० बी इंजिन. त्याला सहा स्पीड क्रूझ ड्राईव्ह ट्रान्समिशन दिेले गेले आहे. ऑडोमीटरसह टँक माऊंटेड इलेक्ट्राॅनिक स्पीडोमीटर, शिवाय टाईम ऑफ द डे क्लॉक, ड्युअल ट्रीपमीटर, आरपीएम गिअर डिस्प्ले, लो फ्यूएल वॉर्निंगसह फ्युएल गेज व सहा स्पीड इंडिकेटर लाईट अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. बाईकची व्हील्स ब्लॅक स्टीलची असून डनलॉप टायरमुळे ओल्या रस्त्यावरही ही बाईक घसरत नाही.

Leave a Comment