प्रकाश देईल शिवाय डासही मारेल हा स्मार्टबल्ब

bulb
हवा असेल तेव्हा प्रकाश देणारा व त्याचबरोबर घरातील त्रासदायक माशा, चिलटे, डास, किटकांचा नाश करणारा स्मार्टबल्ब जेप लाईट नावाने सादर केला गेला आहे. हा एलईडी बल्ब प्रकाश देणारा व घरातील माणसांच्या आरोग्याची काळजी घेणारा आहे असा कंपनीचा दावा आहे. शिवाय या बल्ब मुळे उग्र वासाची कीटकनाशक वापरण्यापसून ही सुटका मिळणार आहे. हा बल्ब नऊ वॉटचा आहे मात्र त्याच्यावरचे ग्रीड १ वॉट ऊर्जेचा वापर करूनच डास, माशा, चिलटे व अन्य किटकांचा नायनाट करते.

या बल्बमधून येणारा निळा प्रकाश डास, माशांना आकर्षित करतो. डास, माशा त्याच्या संपर्कात येताच ग्रीडला चिकटून मरतात. ५०० चौरस फुट जागेतील किटक मारू शकतो व तो सतत ५० हजार तास चालू शकतो. या बल्बची किंमत आहे २० डॉलर्स.

Leave a Comment