‘नासा’च्या मोहिमेचे नेतृत्त्व करणार भारतीय तरुण

nasa
अहमदाबाद – मूळ अहमदाबादमधील भारतीय वंशाच्या सुव्रत महादेवन या तरुणाची आपल्या सौरमालेबाहेरील ग्रहांचा शोध घेण्यासाठी नासा राबवित असलेल्या प्रकल्पातील एका मोहिमेच्या नेतृत्त्वासाठी निवड झाली आहे.

सुव्रत या मोहिमेबाबत माहिती देताना म्हणाले, आपल्या सौरमालेबाहेरील तीन हजार ग्रहांचा शोध गेल्या दोन दशकात लागला आहे. मात्र त्यापैकी एकाही ग्रहावर जीवसृष्टी आढळलेली नाही. ज्ञात आणि अज्ञात सौरमालेतील अनेक ग्रहांचा शोध घेणे अद्यापही बाकी आहे. खूप कठीण हे काम असून आम्हाला आशा आहे की आम्ही नवा शोध लावू. सध्या पेनसिल्वानिया स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये सुव्रत हे सहायक प्राध्यापक म्हणून काम करत आहे. सुव्रत यांच्या नेतृत्त्वाखालील समूहाची नासाने नव्या ग्रहांचा शोध लावण्यासाठी आवश्‍यक असलेल्या एनईआयडी या उपकरणाची निर्मिती करण्यासाठी निवड केली आहे. सध्या भारत दौऱ्यावर असलेल्या सुव्रतने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना याबाबत माहिती दिली.

मूळ अहमदाबादमधील सुव्रत हे असून त्यांचे मुंबई आयआयटी येथून शिक्षण झाल्यानंतर डॉक्‍टरेटच्या शिक्षणासाठी ते १५ वर्षांपूर्वी अमेरिकेला गेले. दरम्यान तेथे त्यांनी काही स्थानिक संशोधन संस्थांमधील संशोधनांमध्ये सहभाग घेतला. सुव्रत यांचे वडिल इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर असून आई इंग्रजीची शिक्षिका आहे. सुव्रत ज्या प्रकल्पासाठी काम करत आहे त्यासाठी अमेरिकेने नासाला ९७ लाख डॉलर एवढा निधी दिला आहे.

Leave a Comment