‘मारुती सुझुकी’ची नवी ‘ऑल्टो ८००’ लॉन्च

maruti-alto
नवी दिल्ली : आपली नवी कोरी कार देशाची सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने लॉन्च केली आहे. सामान्यांच्या खिशाला देखील आपल्या दमदार प्रोडक्टसाठी ओळखल्या जाणाऱ्या कंपनीची ही कार सहज परवडणारी आहे. ‘ऑल्टो ८००’ या मारुती सुझुकीच्या आकर्षक गाडीचे मायलेज पेट्रोलसोबत २४.७ किलोमीटर प्रतीलिटर तर सीएनजी गाडीचे मायलेज ३३.४४ किलोमीटर प्रती किलोग्रॅम असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ऑल्टो ८०० ची सुरुवातीची किंमत २.४९ लाख रुपये असेल. नवी ऑल्टो ८०० च्या एक्सटीरियर आणि इन्टिरिअर दोघांमध्येही बदल करण्यात आले आहेत. नवी ऑल्टो जुन्या ऑल्टोहून लांबलचक असेल, तसेच या गाडीचे मायलेजही अधिक असेल. आत बसण्यासाठी जास्त जागा आणि सुरक्षा हे या गाडीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. गेल्या १२ वर्षांपासून ‘ऑल्टो’ ही गाडी भारतात टॉप सेलिंग मॉडल बनली असून ऑल्टो ही एकुलती एक भारतीय कार ब्रॅन्ड आहे, जिने ३० लाखांच्या विक्रीचा आकडा पार केला आहे.

Leave a Comment