कोळ्याच्या जाळ्यापासून प्रेरणा घेऊन बनले लिक्वीड जाळे

jale
वैज्ञानिकांना ज्या अनेक जगावेगळ्या कल्पना सुचतात, त्या बहुतेकदा निसर्गातले चमत्कार पाहूनच सुचत असतात. ऑक्सफर्ड विद्यापीठ व पियरे अॅन्ड मेरी क्युरी विद्यापीठातील संशोधकांनी कोळ्याच्या जाळ्यापासून प्रेरणा घेऊन लिक्विड वायर बनविण्यात यश मिळविले आहे. या वायरीचा वापर अनेक जटील वायरिंग रचनेसाठी करता येणार आहे.

या संशोधक टीममधील प्रमुख फ्रिज्झ वॉलरथ या विषयी सांगताना म्हणाले की कोळ्याच्या जाळ्याचा प्रत्येक तंतू आश्वर्यकारक रित्या ताणलेल्या अवस्थेत असतो. कोणत्याही करणाने ही तार शिथिल पडायला लागली तर एक प्रकारचा डिंकासारखा पदार्थ त्या तारेला वेढतो व ती तार पुन्हा ताणली जाते. या तारेवर पडलेल्या प्रत्येक थेंबाची क्षमता तशीच असते जी ही तार ताणून धरण्यास मदत करते. या पासून प्रेरणा घेऊन आम्ही प्लॅस्टीक फिलामेंट व तेलाचे थेंब यांचा वापर करून लिक्वीड जाळे तयार केले आहे. या जाळ्यातील तंतूही असेच कायम ताणलेल्या स्थितीत राहू शकतात व सैल पडले तर आपोआप पुन्हा ताणले जातात. यामुळे तंत्रज्ञानात नवी क्रांती होऊ शकेल असा त्यांचा दावा आहे.

Leave a Comment