येथे संकटाची सूचना देतो लाल भैरव

bhairav
देवभूमी हिमाचल मध्ये अनेक मंदिरे आहेत आणि देवीदेवतांच्या अनेक रोचक कहाण्याही येथे ऐकायला मिळतात. अशीच एक रोचक कहाणी शक्तीपीठ ब्रजेश्वरी मंदिराबाबतही सांगितली जाते. कांगडा भागात असलेल्या या मंदिराच्या आवारात लाल भैरवाचे मंदिर आहे. या मंदिरातील मूर्ती पाच हजार वर्ष जुनी असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणज कांगडा भागावर कांही संकट येणार असेल तर या मूर्तीच्या डोळ्यातून अश्रू येतात व अंगाला घाम येतो. अनेकदा हा चमत्कार घडला आहे. त्यानंतर तेथील पूजारी देवी ब्रजेश्वरीपूढे होमहवन करून व मूर्तीला अभिषेक करून संकट निवारण्याची प्रार्थना करतात.त्यामुळे संकट टळते अशी भाविक व स्थानिकंची श्रद्धा आहे.

स्थानिक लोक संागतात, अगदी अलिकडे म्हणजे १९७७ सालात असाच या मूर्तीला घाम आला व डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यावेळी कांगडा बाजारात मोठे अग्नीतांडव झाले व तेथील अनेक दुकाने भस्मसात झाली. तेव्हापासून दर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये भैरव जयंती येथे साजरी केली जाते. त्यावेळी पूजा, होमहवन केले जाते. ब्रजेश्वरी हे पार्वतीचे शक्तीपीठ असून येथे सतीदेवीचा उजवा स्तन पडला होता असा समज आहे. येथे तीन धर्माच प्रतीक म्हणून सती देवीच्या तीन पिंडीची पूजा केली जाते. त्यातील एक ब्रजेश्वरी, एक भद्रकाली व तिसरी माँ एकादशी असल्याची भावना आहे.

1 thought on “येथे संकटाची सूचना देतो लाल भैरव”

Leave a Comment