येताहेत मोबाईल चार्ज करणारे फॅशनेबल कपडे

charge
तंत्रज्ञानाचा वापर सर्वच क्षेत्रात वाढू लागला असताना फॅशन क्षेत्र त्यापासून दूर राहणे शक्यच नाही.मोबाईल ही आज जीवनावश्यक गोष्ट बनली असली तरी मोबाईल चार्जर बरोबर बाळगणे हे त्रासाचेच काम आहे. या त्रासापासून सुटका देऊ शकेल असे फॅशनेबल कपडे बाजारात येऊ घातले असून त्यात तुमच्या कपड्यांच्या खिशात मोबाईल ठेवला की तो आपोआप चार्ज होणार्‍या कपड्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे कपडेही फॅशनेबल असतील त्यामुळे कुठेही महत्त्वाच्या ठिकाणी अथवा पार्टी समारंभाना जातानाही ते वापरता येतील.

न्यूयॉर्क फॅशन्सच्या अमांडा पार्क म्हणतात, लोकांना तंत्रज्ञानाच्या संयोगाने बनविलेले कपडे ही संकल्पना खूपच आवडते आहे. आपण कोणीतरी वेगळे व विशेष आहोत ही भावना येण्याबरोबरच लोकांना या कपड्यांमुळे कांही सोयीही हव्या आहेत. त्यामुळे मोबाईल रिचार्ज करू शकणारे कपडे येऊ घातलेत यांत विशेष नवल नाही. अर्थात त्यासाठी फॅशन डिझायनर आणि तंत्रज्ञ यांना एकत्र काम करावे लागणार आहे. आरोग्य राखतील असे शर्ट, हृदयाचे ठोके नियमित आहेत वा नाहीत हे सांगणारे कापड, श्वसनावर नजर ठेवणारे कपडे व ही सर्व माहिती आयफोन अथवा अॅपल वॉच पर्यंत पोहोचविणारे डीजिटल टीशर्ट आले आहेत. मात्र ते फॅशनच्या दृष्टीने पुरेसे नाहीत.

त्यामुळेच तंत्रज्ञानाच्या मदतीने या कपड्यांत क्रांती केली जात आहे. आता शरीरयष्टीप्रमाणे आकार घेणारे कपडे, थंडीत गरम व उन्हाळ्यात थंड ठेवणारे कपडे, बायोमेट्रीक टी शर्ट बनले आहेत. त्याचप्रमाणे हे मोबाईल चार्जर कपडेही बाजारात येत आहेत.

Leave a Comment