फ्लिपकार्ट अवघ्या ४,४९९ रूपयांत देणार आयफोन ५एस

flipkart
आपल्या ग्राहकांसाठी खास स्मार्टफोन सेल ‘मोबाईल मेनिया’ ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टने आणला आहे. या सेलचा आजचा दुसरा दिवस आहे. या सेलमध्ये मोटोरोला स्मार्टफोन, नेक्सस ६पी, आयफोन ५एस, आसूस जेनफोन २ आणि सॅमसंगच्या जे सीरीजसह अनेक स्मार्टफोनवर घसघशीत डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करणार असल्यास हा सेल तुमच्यासाठी नक्कीच खास ठरु शकतो. त्यामुळे आता आयफोनच्या चाहत्यांसाठी ही खुशखबर आहे.

फ्लिपकार्टवर मिळणाऱ्या या मोबाईल मेनियामध्ये अॅपल आयफोन ५एस, मोटोरोला मोटो एक्स प्ले, आसुस जेनफोन २, लेनोवा वाईब पी १, लेईको ले १एस इको आणि सॅमसंग गॅलक्सी जे ७ (२०१६) यांचा समावेश आहे.

आयफोन ५एस : आयफोन ५एस मोठ्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे. हा आयफोन ग्राहक १९,४९९ रुपयात खरेदी करु शकतात. फ्लिपकार्टने या फोनवर १५,००० पर्यंत एक्सचेंज ऑफर दिली आहे. या ऑफरनंतर आपण आयफोन ५एस अवघ्या ४,४९९ रुपयात खरेदी करु शकता.

मोटो एक्स प्ले : १५००ची सूट मोटोरोलाच्या मोटो एक्स प्ले या स्मार्टफोनवर मिळणार आहे. या ऑफरनंतर हा स्मार्टफोन १७,४९९ रु. खरेदी करता येणार आहे. तर एक्सचेंज ऑफरनुसार १४,००० पर्यंत सूट मिळू शकते.

झेनफोन २: फ्लिपकार्ट आसूस झेनफोन २ वर एक्सचेंज ऑफरही देत आहे. या फोनच्या ४ जीबी व्हेरिएंटवर ४००० रुपयांची सूट आहे. त्यामुळे याची किंमत १४,९९९ रु. आहे. तर २ जीबी व्हेरिएंटवर ३००० रुपयांचे डिस्काउंट आहे. ज्यानंतर त्याची किंमत १०,९९९ रु. एवढी आहे. या दोन्ही स्मार्टफोनवर १२,००० आणि ९,००० रुपयापर्यंत एक्सचेंज ऑफर आहे.

वाईब पी १ : लेनोव्हो वाइब पी१ वर रुपये ५००० पर्यंत सूट देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन १३,४९९ रु. खरेदी करता येऊ शकतो.

ले १एस इको : या सेलमध्ये एचडीएफसीकार्ड यूजर्सना १०% पर्यंत कॅशबॅक मिळेल. तसेच हा स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला एक वर्षापर्यंत लेईको मेंबरशिप मिळणार आहे.

सॅमसंग गॅलक्सी जे७ (२०१६) : या सेलमध्ये हा स्मार्टफोन १३,९९० रुपयात खरेदी करता येणार आहे. यासोबत एक्सचेंज ऑफरनुसार २,९९० रुपयापर्यंत सूट मिळू शकते.

Leave a Comment