तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये ही महिला असेल तर लगेच करा डिलीट

facebook
मुंबई : सध्या एका महिलेचे फेसबुक अकाऊंट व्हायरल होत आहे. जे अकाऊंट फेक असल्याचे सांगण्यात येत असून ते बंद कऱण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरु आहे. मधु शाह या नावाची एक दोन नव्हे तर ३४ अकाऊंट फेसबुकवर आहेत. ही सर्व अकाऊंट्स फेक असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व अकाऊंटमध्ये एकाच महिलेचा फोटो आहे. मात्र ठिकाण वेगवेगळे दाखवत आहेत.जर तुम्ही मधु शाह या नावाने सर्च केल्यास तुम्हाला लोक या मुद्द्यावर चर्चा करताना दिसतील. सोशल मीडियावरील लोकांचे म्हणणे आहे की या अकाऊंटमधील म्युच्युअल फ्रेंड पाहून लोक मधु शाह नावाच्या व्यक्तीची रिक्वेस्ट स्वीकारत आहेत.

Leave a Comment