एडीबीच्या संचालकपदी भारतीय वंशाच्या स्वाती दांडेकर

swati-dandekar
वॉशिंग्टन : भारतीय वंशाच्या मुत्सद्दी स्वाती दांडेकर यांची आशियाई विकास बँकेच्या कार्यकारी संचालकपदी अमेरिकी संसदेने नेमणूक केली आहे. राजदूताच्या दर्जाचे हे पद आहे. रॉबर्ट ए. ओर यांची जागा दांडेकर या घेतील. ओर हे २०१० पासून या पदावर कार्यरत होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आशियाई बँकेच्या सर्वोच्च अमेरिकी पदासाठी ओबामा यांनी स्वाती दांडेकर यांची नेमणूक केली होती. ६५ वर्षीय स्वाती दांडेकर २००३ ते २००९ या काळात आयोवा प्रतिनिधी सभेच्या सदस्य होत्या. तसेच २००९ ते २०११ या काळात त्या आयोवा सिनेटच्याही सदस्य होत्या.

Leave a Comment