ई-कॉमर्सच्या स्पर्धेत ‘टाटा’ची एंट्री!

tata
जयपूर : आपला पसारा आता ई-कॉमर्स क्षेत्रात पसरवण्यास टाटा ग्रुपने सुरुवात केली आहे. लवकरच टाटा ग्रुप आपले नवीन व्हेंचर शॉपिंग वेबसाईट ‘क्लिक्यू’च्या माध्यमातून घराघरात दाखल करण्याचा टाटाचा मानस आहे. भारतातला सर्वात मोठ्या ग्रुपपैंकी एक टाटा ग्रुप हा मानला जातो. आपल्या ‘क्लिक्यू’ (CLiQ)या वेबसाईटवर टाटा गेल्या दोन वर्षांपासून काम करत आहेत.

ही वेबसाईट सामान्यांसाठी २७ मेपासून सुरू होणार आहे. आपल्या पसंतीच्या गोष्टी ग्राहकांना येथे ऑनलाईन पद्धतीने खरेदी करता येतील. ग्राहकांना ध्यानात घेता कंपनीने जवळपास ८० ब्रॅन्ड्सना यासाठी हाताशी घेतले आहे. मोबाईल अॅप्लिकेशनच्या माध्यमातूनही ही वेबसाईट काम करताना दिसेल. मात्र यामुळे, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, अमेझॉन, फॅशन ई मिंत्रा, जेबाँग यांसारख्या शॉपिंग वेबसाईटचे धाबे मात्र दणाणले आहेत. ‘क्लिक्यू’ला टक्कर देणे त्यांच्यासाठी खूप सोप्पी गोष्ट ठरणार नाही, एवढे नक्की.

Leave a Comment