आणखी चार सेवा बँकेतून मिळणार

bank
नवी दिल्ली – आपल्याला बँकेकडून चालू आर्थिक वर्षामध्ये चार नवीन सुविधा उपलब्ध होणार असून यांच्या माध्यमातून आपल्याला बिल पेमेंट करणे, टोलची रक्कम भरण्यासह बस, मेट्रो यांच्यामधून प्रवास करणे सुलभ होणार आहे. याच्यासह पहिल्यांदा भारताचे स्वतःचे रुपे कार्डही क्रेडिट कार्ड विभागामध्ये दाखल करण्यात येणार आहे. या सेवा दाखल करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनने तयारी सुरू केली आहे.

आपल्याला लवकरच वीज बिल, शाळेची फी, नगरपालिका बिल, टेलिफोन बिल, मोबाईल बिलाचा भरणा करणे सुलभ होणार आहे. ग्राहकांना अतिशय कमी वेळेमध्ये ऑनलाईन रक्कम जमा करण्यासाठी मदत होणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यासाठी भारत बिल पेमेंट प्रणालीला विकसित करण्याचे काम केले आहे. आता सेवा सुरू करण्यासाठी तात्काळ हालचाली करण्यात येत आहे.

Leave a Comment