ATMच्या पार्श्वभूमीवर पिझ्झाचे ATP मशीन

pizza
मुंबई – प्रत्येकजण सध्याच्या काळात आपल्या कामामध्ये बिझी असल्यामुळे हॉटेलमध्ये चटपटीत खाद्य अनेकजण खातात किंवा ऑर्डर देणेच पसंत करतात. अनेकजणांना पिझ्झा खायला आवडते. मात्र, पिझ्झा येण्यासही जवळपास अर्धातास लागतो. मात्र, आता यापुढे तुम्हाला इतका वेळ वाट पाहण्याची गरज लागणार नाही. कारण पिझ्झाही आता केवळ ४ मिनिटांमध्ये उपलब्ध होणार आहे. मात्र, आता केवळ ४ मिनिटांमध्ये पिझ्झा उपलब्ध होणार होऊ शकणार आहे आणि तेही एटीएम सारख्याच एका मशीनच्या माध्यमातून.

काही खाण्याची ऑर्डर एखाद्या हॉटेलमधून केल्यास कधीकधी ऑर्डर येण्यासही अर्धातास लागतो. मात्र, आता तुम्हाला थांबण्याची गरज लागणार नाही. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आता फक्त ४ मिनिटांत पिझ्झा मिळणार आहे. या हॉटेलमध्ये एनी टाईम पिझ्झा (एटीपी) मशीन बसवण्यात आली आहे.

म्हणजेच ज्याप्रमाणे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आपण कार्ड स्वाईप करतो आणि पैसे काढतो. त्याचप्रमाणे या मशीनमध्ये पैसे टाकून आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत ज्यानंतर केवळ ४ मिनिटांमध्ये तुम्हाला पिझ्झा मिळणार आहे. या मशीनचं नाव एटीपी म्हणजेच एनी टाईम पिझ्झा असे आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एन टाईम पिझ्झा (एटीपी) मशीनचे लॉन्चिंग करण्यात आले आहे.

Leave a Comment