इंटरनेट युजर्ससाठी आयडियाची खुशखबर

idea
मुंबई : ३जी आणि ४जी च्या नाईट डेटा पॅकच्या किंमतीदेशातील तीसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आयडियाने सेल्युलरने ५० टक्क्यांनी कमी केल्या आहेत. आयडिया युजर्स आता १ जीबी नाईट डेटा प्लान फक्त १२५ रुपयात मिळवू शकता. डे आणि नाईटसाठी ट्विन डेटा पॅक देखील कंपनीने लॉन्च केला आहे. यामध्ये युजर्सला ३० टक्के सूट मिळणार आहे. ५०० एमबी(250एमबी डे आणि 250 एमबी नाईट) फक्त ११५ रुपयात दिला जाणार आहे. यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही ४० जीबी पर्यंतचा प्लॅन घेऊ शकता.

ग्राहकांना इंटरनेट वापराचा अधिक आनंद घेता यावा यासाठी या प्लान आणला असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. ३ जी आणि ४ जी या दोन्हीमध्ये हे प्लान उपलब्ध आहेत. याआधी एअरटेलने ही इंटरनेट प्लानच्या किंमती कमी केल्या होत्या. मागील आठवड्यात एअरटेलने डबल डेटा देत प्रीपेड डेटा पॅक लॉन्च केल्यामुळे ग्राहकांना ३० टक्के फायदा होणार आहे. २५९ रुपयात प्रीपेड डेटा पॅकमध्ये १ जीबी ३ जी आणि ४जी डेटा २८ दिवसांसाठी दिला जाणार आहे. तर २९६ रुपयात डबल डेटा पॅक म्हणजेच २ जीबी डेटा म्हणजेच १जीबी प्रत्येकी ३जी आणि ४ जीसाठी दिला जाणार आहे. रात्रीच्या वेळेत १ जीबी अतिरिक्त डेटा दिला जाणार आहे.

Leave a Comment