अवघ्या ८,४९९ रूपयांत मायक्रोमॅक्स 4G स्मार्टफोन

micromax
मुंबई : स्मार्टफोनच्या विश्वातील आघाडीचा भारतीय ब्रॉंड मायक्रोमॅक्सने नुकतेच आपल्या ‘कॅनव्हास इव्होक’ या 4G स्मार्टफोनचे लॉंचिंग केले असून अवघी ८,४९९ रूपये इतकी किंमत असलेला हा फोन सध्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

कसा आहे ‘कॅनव्हास इव्होक‘ – यात ५.५ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून त्याचे रिझॉल्युशन – १२८०×७२० पिक्सल एवढे आहे. त्याचबरोबर १.४ GHz ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४१५ प्रोसेसर आणि ३जीबी रॅम देण्यात आले आहेत. याची इंटरनल मेमरी १६ जीबीची असून ती मेमरीकार्डद्वारे वाढवण्याची क्षमता आहे. १३ मेगापिक्सलचा एलईडी फ्लॅशसह रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात ४जी LTE सपोर्ट, मायक्रो यूएसबी, वाय-फाय ८०२.११ बी/जी/एन, ब्लूटूथ ४,०, जीपीएस, ए-जीपीएस यासारख्या कनेक्टिव्हिटी देण्यात आल्या आहेत. दरम्यान, गेले अनेक दिवस या फोनबाबत लोकांच्या मनात उत्सुकता होती. अखेर मायक्रोमॅक्सने फोन लॉंच केला. कंपनीच्या इतर फोनप्रमाणेच या स्मार्टफोनचे ग्राहक स्वागत करतील, असे कंपनीने म्हटले आहे.

Leave a Comment