स्नॅक्स बाजारात हल्दीरामच आघाडीवर

haldiram
दिल्ली- भारतात विविध क्षेत्रात देशी विदेशी कंपन्या आपापल्या उत्पादनांचा हिस्सा वाढविण्याच्या स्पर्धेत असताना भारतातील स्नॅक्स बाजारावर मात्र हल्दीरामचे वर्चस्व असल्याचे युरोमॉनिटरच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. स्नॅक्स बाजारातही देशी विदेशी कंपन्यात तगडी स्पर्धा आहे मात्र हल्दीरामने या बाजारात आपला हिस्सा १८ टक्क्यांवर नेऊन अव्वल स्थान मिळविले आहे.

युरोमीटरच्या आकडेवारीनुसार दोन नंबरवर विदेशी कंपनी पेप्सिकोचे लेज हे उत्पादन आहे. त्यांचा बाजारातील हिस्सा १५.२ टकके आहे. त्या पाठोपाठ कुरकुरे १४ टक्के हिस्सा मिळवून तीन नंबरवर आहे. चार नंबरवर आहे बालाजी वेफर्स. त्यांचा या बाजारात ७.५ टक्के हिस्सा आहे. पाच नंबरवर आयटीसीचे बिंगो हे उत्पादन असून त्यांचा बाजारातील वाटा ६.६ टक्के इतका आहे.

Leave a Comment