सोनी एक्सपिरीया एक्स ए अल्ट्रा सादर

experia
सोनीने त्यांच्या एक्सपिरीया सिरीजचा विस्तार करताना नवा एक्सए अल्ट्रा स्मार्टफोन सादर केला आहे. या फोनचे वैशिष्ठ म्हणजे त्याला १६ एमपीचा फ्रंट कॅमेरा सोनी एक्समोर आर मोबाईल सेंसरसह व फ्लॅशसह दिला गेला आहे. हा कॅमेरा ओआयएस ऑटोफोकस, वाईड अँगल लेन्स, एचआरडी फोटो फिचर्सनी युक्त आहे. शिवाय या फोनला एक्समोर सेंसरसह २१.५ एमपीचा रियर कॅमेराही दिला गेला आहे.

या फोनला सहा इंची फुल एचडी स्क्रीन, अँड्राईड ६.० मार्शमेलो, ३ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल मेमरी ती कार्डच्या सहाय्याने २०० जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. तसेच हा सिंगल नॅनो सिम फोन असून तो फोर जी, थ्रीजी, एलटीई, जीपीएस, वायफाय, ब्ल्यू टूथ, मायक्रो यूएसबी सपोर्ट करतो. या फोनची बॅटरी जलद चार्ज होणारी आहे व ती दोन दिवस चालते असाही कंपनीचा दावा आहे. कंपनीने ग्लोबल वेबसाईटवर हा फोन काळा, पांढरा व लाईम गोल्ड व्हेरीएंटमध्ये लिस्ट केला आहे मात्र त्याची लॉचिंग तारीख अथवा किंमत जाहीर केली गेलेली नाही.

Leave a Comment