शेवरलेची नवी २०१७ कमेरो झेड एल वन कार

chevrole
शेवरलेने त्यांची नवी २०१७ कमेरो झेडएल वन स्पोर्टस कार सादर केली आहे. या कारला १० स्पीड ऑटोट्रान्समिशन दिले गेले असून हेच या कारचे वैशिष्ठ ठरले आहे. अत्यंत आकर्षक स्वरूपात ही कार पेश केली गेली आहे. तिला ६.२ लटरचे एलटीजी व्ही ८ इंजिन आहे. ही कार कन्वर्टिबल मॉडेलमध्येही सादर केली गेली आहे.

या कारसाठी दोन ट्रान्समिशन ऑप्शन्स आहेत. ६ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन व १० स्पीड ऑटो ट्रान्समिशन अशी ही ऑप्शन्स आहेत. कारची केबिन अतिशय आरामदायी आहे. त्याचबरोबर वेगाने जात असतानाही प्रवाशांना त्रास होणार नाही अशा खास सीटस त्यात आहेत. ही कार युवा पिढीसाठी आदर्श ठरेल असा कंपनीचा दावा आहे. कारच्या किंमती अद्यापी जाहीर केल्या गेलेल्या नाहीत.

Leave a Comment