भारताची सांस्कृतिक, भौगोलिक, सामाजिक विविधता जगाच्या दृष्टीनेही कुतुहलाचा विषय आंहे. मात्र भारतात श्रद्धा व धर्म यांतही विविधता विपुल प्रमाणात आहे. येथे देवदेवतांबरोबरच सर्वसामान्य माणसे, झाडे, पशुपक्षी यांचीही पूजा केली जाते. राजस्थानातील जोंधपूर अहमदाबाद रस्त्यावरील पालीपासून २० किमी अंतरावर असलेल्या रोहिट या स्थानी तर चक्क मोटरसायकलची पूजा करून नवस बोलला जातो. प्रत्यक्षात येथे ओमसिंह राठोड यांचा अपघाती मृत्यू झाला मात्र हा अपघात कसा झाला हे कधीच समजू शकले नव्हते. त्यानंतर हे स्थान ओम बन्नाका स्थान म्हणून प्रसिद्धीस आले आहे. येथे ओमसिंह यांच्याबरोबर त्यांच्या मोटरसायकलची पूजा केली जाते.
येथे मोटरसायकलला बोलला जातो नवस
असे समजते की ओमसिंसिह राठोड यांचा २८ वर्षांपूवी या जागी मोटरसायकल अपघातात मृत्यू झाला. तेथे रोज किमान एक तरी अपघात होत असे. राठोड यांची अपघातग्रस्त मोटरसायकल पोलिस ठाण्यात ठेवली गेली होती ती रात्रीत गायब होऊन पुन्हा अपघातस्थळीच सापडली. हा प्रकार रोजच होऊ लागल्यानंतर राठोड यांच्या मृत आत्म्याची इच्छा म्हणून त्यांच्या घरच्या लोकांनी येथे एक शेड बांधून तेथे ही मोटरसायकल ठेवली.विशेष म्हणजे तेव्हापासून या जागी एकही अपघात झाला नाही. कारण अपघात होत असेल तर ओमसिह राठोड संबंधित व्यक्तीला तशी सूचना देतो व अपघातातून वाचवितो असे सांगितले जाते. येथील पोलिस चौकीवर नियुक्त झालेले पोलिसही प्रथम ओम बन्ना का स्थानला भेट देऊन नमस्कार करतात. गेली २८ वर्षे हे स्थान श्रद्धास्थान असून आता त्याचे भक्तीस्थानात रूपंातर झाले आहे. आजही येथे भाविकांची अलोट गर्दी होत असते.