यापठ्ठ्याने १० वीत मिळवले पैकीच्यापैकी गुण

student
मुंबई : अनेक राज्यांचे १० वी आणि १२ वीचे निकाल लागण्यास सुरुवात झाली असून अनेक विद्यार्थ्यांनी ज्यामध्ये चांगले यश मिळवले आहे. पण तुम्ही कधी सगळ्याच विषयांमध्ये पैकीच्यापैकी गुण मिळवल्याचे ऐकले आहे का ? पण एका विद्यार्थ्याने १० वीच्या परीक्षेत हे शक्य करुण दाखवले आहे.

१० वीच्या परीक्षेत कर्नाटक एजुकेशन बोर्डाच्या शिवमोगा जिल्ह्यातील भद्रावती येथील रंजनने मोठे यश मिळवले आहे. रंजन जेव्हा सोमवारी सकाळी झोपेतून उठला तेव्हा तो आयपीएल मॅचवर बोलत होता. तेव्हा त्याच्या शिक्षकाने त्याला त्याच्या निकालाची माहिती दिली. ज्यामध्ये त्याने ६२५ पैकी ६२५ गुण मिळवले. कर्नाटक बोर्डात त्याने टॉप केला आहे. याबाबत रंजनचे म्हणणे आहे की, त्याने कोणतेही ट्युशन न लावता घरीच रोज ६ तास अभ्यास केला. तो रोज सकाळी अभ्यास करण्यासाठी लवकर उठायचा. त्याच्या या यशाबाबत त्याच्या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Comment