बसभाड्याच्या पैशात स्पाईसजेटचा विमानप्रवास

spicejet
मुंबई – आपल्या ११व्या वर्धापनदिनानिमित्त प्रवाशांसाठी एक खास ऑफर स्पाईसजेट या विमान कंपनीने उपलब्ध करुन दिली आहे. या ऑफरमुळे रेल्वे आणि खासगी ट्रॅव्हल्सच्या तिकिटापेक्षाही कमी किमतीत विमान प्रवास करण्याची संधी प्रवाशांना उपलब्ध झाली आहे.

या ऑफरनुसार, देशांतर्गत विमान प्रवासाचे किमान भाडे रुपये ५११ पासून सुरू होणार आहे. तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचे भाडे रुपये २१११ पासून सुरू होणार आहे. ही ऑफर तीन दिवसांसाठी असणार असुन या काळात तुम्ही तिकिट बुकिंग करु शकता. १७ मे ते १९ मे २०१६ च्या मध्यरात्रीपर्यंत तिकिट बुकिंग करता येणार आहे. प्रवासी या ऑफरनुसार, देशांतर्गत प्रवास १५ जून ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत करू शकतील. तर आंतरराष्ट्रीय प्रवास १ जून ते २० जुलै २०१६ या कालावधीत करू शकणार आहेत.

मर्यादित प्रमाणात या ऑफर्सची तिकीटे उपलब्ध असल्यामुळे प्रथम येणा-याला पहिले तिकीट या आधारावर तिकीटे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला येत्या काळात प्रवास करायचा असेल तर या ऑफरचा फायदा नक्की घ्या.

Leave a Comment