टीम कुक मोदी भेटीसाठी भारतात

cook
अॅपल इंकचा सीईओ टीम कुक मंगळवारी भारताकडे रवाना झाला असल्याचे व तो पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार आयफोनच्या विक्रीत घट येत असल्याने या विक्रीला पुन्हा गती देण्यासाठी कुक आशियाई देशांच्या दौर्‍यावर निघाला आहे. भारतानंतर तो चीनलाही भेट देणार आहे. भारतात पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर तो भारतातील अॅपलचे कर्मचारी व भागीदार यांच्याबरोबरही बैठक घेणार आहे.

भारतीय बाजारात अॅपलही हिस्सेदारी २ टक्के आहे. मात्र पहिल्या तिमाहीत अॅपलच्या विक्रीत ५६ टक्के वाढ नोंदविली गेली आहे. यात आयफोन फाईव्ह एस या फोनचे योगदान मोठे आहे. अॅपल भारतात त्यांचे पहिले रिटेल आऊटलेट सुरू करण्याच्या विचारात आहे. तसेच भारतात वापरलेले जुने आयफोन विक्रीसाठी परवानगी नाही ती मिळविणे हाही कुक यांच्या भेटीमागचा उद्देश आहे. गतवर्षी अॅपलने भारतात १० कोटी आयफोन विकले असून यावर्षी त्यात २५ टक्के वाढ अपेक्षित आहे. गतवर्षी पंतप्रधान मोदी अमेरिकेतील सिलीकॉन व्हॅलीत गेले होते तेव्हाही कुक यांनी मोदींची भेट घेतली होती.

Leave a Comment