सर्वसामान्यांचे जगणे झाले महाग

vegetable
नवी दिल्ली : सतत १७ महिन्यांच्या घसरणीनंतर घाऊक महागाई दरात एप्रिलमध्ये ०.३४ टक्के वाढ झाली आहे. डाळी, साखर, बटाट्यांसह अनेक खाद्य पदार्थांच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. गेल्या महिन्यात ऋणात्मक ०.८५ टक्के महागाई दर होता. या संदर्भात सरकारने आकडेवारी जारी केली आहे.

गतवर्षी एप्रिलच्या तुलनेत आकडेवारीनुसार डाळींच्या घाऊक किमतींमध्ये ३६.३६ टक्के, बटाट्यांच्या किमतीत ३५.४५ टक्के आणि साखरेच्या दरात १६.०७ टक्के वाढ झालेली आहे. खाद्यान्न, पालेभाज्यांचा महागाई दर ३ महिन्यांतील उच्चांकी पातळीवर म्हणजे ४.२३ टक्क्यांवर पोहोचला आहे. मात्र डाळी आणि बटाट्यांशिवाय इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत फारशी वाढ झालेली नाही. मांस, मच्छी आणि अंडी यांच्या दरात ३.३४ टक्के, दुधाच्या दरात २.८३ टक्के, अन्नधान्याच्या दरात २.६४ टक्के तर पालेभाज्यांच्या दरात २.२१ टक्के वाढ झाली आहे तसेच कांदा दरात १८.१८ टक्के आणि फळांच्या दरात २.३८ टक्के स्वस्ताई झाली.

अखाद्य पदार्थांमध्ये फराळाच्या दरात ५.६८ टक्के, फायबरमध्ये ५.२७ टक्के तर खनिजांच्या दरात २७.२४ टक्क्यांची घट झाली आहे. इंधन तसेच ऊर्जा वर्गात पेट्रोल दरात ४.१८ टक्के, डिझेलमध्ये ३.९४ टक्के तर घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर दरात १.८४ टक्के घट झाली आहे. मात्र खाद्य तेलांच्या किमतींमध्ये ५.६१ टक्के वाढ झाली आहे. चमडा आणि चमड्यापासून निर्मित उत्पादनांच्या दरांतदेखील २.०३ टक्क्यांची वाढ झाली आहे. पोलाद दरात ८.६७ टक्के, धातू, यौगिक धातू आणि मिश्र धातूंच्या दरात ४.६५ टक्के, सिंथेटिक कपडे २.८७ टक्के, रबर, प्लास्टिक उत्पादनांच्या दरात १.८९ टक्के स्वस्ताई झाली आहे.

या वर्षी मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये घाऊक महागाई दर १.३७ टक्के राहिला त्यामध्ये प्राथमिक उत्पादनांच्या किमतीत १.९२ टक्के, इंधन आणि ऊर्जा वर्गातील उत्पादनांच्या किमतीत १.७४ टक्के वाढ झाली आहे. खाद्य पदार्थांचा महागाई दर २.०१ टक्के इतका राहिला आहे तर अखाद्य उत्पादनांचा महागाई दर ३.०१ टक्के होता. एप्रिलमध्ये बटाट्यांच्या दरात १७.११ टक्के, फळांच्या दरात ८.२६ टक्के, पालेभाज्यांच्या दरात ४.७२ टक्के तसेच डाळींच्या दरात ३.९८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Leave a Comment