लवकरच मुंबईत कृत्रिम समुद्रकिनारा

sea-face
मुंबई : मुंबईच्या पर्यटनाचे आकर्षणबिंदू म्हणजे समुद्रकिनारे आणि समुद्र. मुंबईला लाभलेला हा लांबलचक समुद्रकिनारा ही तिची खरी ओळख. लवकरच मुंबईच्या या समुद्रकिना-यांना वेगळी ओळख मिळणार आहे. येत्या तीन वर्षांमध्ये मुंबईत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड कृत्रिम समुद्रकिनारा साकारणार आहे. गिरगाव चौपाटी ते मरीन ड्राईव्ह या दरम्यान हा आकर्षक समुद्रकिनारा पाहायला मिळणार आहे. या पट्ट्यात असलेले भले मोठे दगड हटवून हा किनारा तयार करण्यात येणार आहे. यासाठी एकूण ८२७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून यासाठी काही निधीची मदत आशियाई विकास बँकेकडून करण्यात येणार आहे.

२०१९ पर्यंत कृत्रिम समुद्रकिनारा साकारला जाणार आहे. सागरी सुरक्षा आणि व्यवस्थापन गुंतवणूक उपक्रमांतर्गत हा कृत्रिम समुद्रकिनारा बनविण्यात येत आहे. मरीन डड्ढाईव्हशिवाय आणखी १० ठिकाणी असाच उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात सध्या समुद्रकिनारी असणा-या भल्या मोठ्या दगडांऐवजी वाळूचा वापर करण्यात येणार आहे. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी सागरीमार्गे बोटींच्या आधारेवाळूची वाहतूक केली जाणार असून गिरगाव चौपाटीची क्षमताही वाढणार आहे. गिरगाव चौपाटी ते मरीन डड्ढाईव्ह या समुद्रकिना-याचा विकास करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

उपक्रमाचे काम दोन टप्प्यांमध्ये सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात गिरगाव चौपाटी ते मरीन डड्ढाईव्ह उड्डाण पूल आणि त्यानंतरच्या टप्प्यात उड्डाण पुलापासून पुढे हे काम करण्यात येणार आहे. या उपक्रमात मरीन डड्ढाईव्हचा ३५ टक्के भाग व्यापला जाणार आहे. आशियायी विकास बँकेकडून ४८० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात येणार आहे तर खासगी क्षेत्र आणि राज्य सरकारकडूनही मदत घेतली जाणार आहे.

Leave a Comment