नोकरी गेल्यानंतरही ३ वर्षापर्यंत मिळणार जीवन विमा

epfo
नवी दिल्ली – आपल्या सदस्यांसाठी खास योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) सादर करणार असून याच्या अंतर्गत जर सदस्यांची नोकरी काही कारणांनी गेली तर त्याला ३ वर्षापर्यंत जीवन विमा मिळणार आहे. या योजनेला पुढील महिन्यात होणा-या ईपीएफओ ट्रस्ट मंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सदस्याला कर्मचारी ठेव लिंक्ड विमा (ईडीएलआय) योजनेंतर्गत कव्हर करण्यात येणार आहे. या अंतर्गत लवकरच मिळणारा फायदा ६ लाख रुपये करण्यात येणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर पुढील महिन्यापासून या योजनेचा लाभ सदस्यांना मिळण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती प्रमुख सूत्रांनी दिली आहे.

Leave a Comment