Skip links

‘ते’ चित्रपट जास्त पाहणारे लोक बनतात धार्मिक

porn
वॉशिंग्टन- पॉर्न आणि धर्माचा तसा पाहायला गेल्यास काय संबंध असाच प्रश्न तुमच्या मनात येऊ शकेल परंतु जास्त पॉर्नोग्राफी पाहणारे लोक मोठ्या प्रमाणात धार्मिक होतात असे एका संशोधनाद्वारे आढळून आले आहे.

आठवड्यात दोन पेक्षा अधिक वेळा पॉर्नोग्राफी जे लोक पाहतात ते आठवड्यातून एक वेळ पॉर्नोग्राफी पाहणाऱ्यांपेक्षा जास्त धार्मिक असतात. १,३०० पेक्षा अधिक अमेरिकन लोकांवर संशोधन करुन हा निष्कर्ष अमेरिकेतील संशोधक सॅम्युयल पेरी यांनी काढला आहे.

एक न्यूनत्वाची भावना पॉर्नोग्राफी पाहणाऱ्यांच्या मनात तयार होते, त्यांना काही काळानंतर ‘गिल्टी फील’ होते. त्यामुळे ते प्रार्थना अधिक तीव्रतेने करतात. ज्या लोकांना कधीच पॉर्न पाहिलेले नाही ते अधिक निर्मळ असल्याचेही आढळून आले. त्यांचा धर्मावरील विश्वास अढळ असल्याचे लक्षात आले. अमेरिकेतील पॉर्नोग्राफी दर्शकांसाठी हा एक नैतिक संभ्रम असल्याचे पेरी यांनी म्हटले आहे. पॉर्न पाहावे की नाही याबाबत धार्मिक लोकांच्या मनात एक संशय येत राहतो त्यातून मनात गंड निर्माण होतो. त्यातूनच ते ईश्वराची प्रार्थना करतात असे पेरी यांनी म्हटले आहे. परंतु, जर रोजच पॉर्नोग्राफी पाहण्याची सवय लागली तर दर्शक धार्मिक बनत नाही असे देखील त्यांनी म्हटले आहे.