जपानी इसुझूची डी-मॅक्स व्ही-क्रॉस लाँच

dmax
नवी दिल्ली : भारतात जपानची कार निर्माता कंपनी इसुझूने डी-मॅक्स व्ही-क्रॉस ही कार लाँच केली आहे. ऑटो एक्स्पो २०१६मध्ये कंपनीने या गाडीला सादर केले होते. या कारची चेन्नईतील एक्स शोरूम किंमत १२.४९ लाख इतकी आहे. या गाडीला आंध्र प्रदेशच्या श्री सिटी येथील प्लांटमध्ये तयार करण्यात आले आहे. या गाडीसाठी बुकिंग सुरू करण्यात आले आहे.

व्ही-क्रॉसमध्ये २.५लीटरचे ४ सिलिंडर टर्बो डिझेल इंजिन लावण्यात आले आहे. या गाडीच्या सर्व चाकांमध्ये ट्रान्समिटिंग पॉवरसह ५-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स दिला आहे. गाडीच्या इंटीरियरमध्ये ७ इंचाची टचस्क्रीन मनोरंजन सुविधा दिलेली आहे, ज्याला यूएसबी, डीव्हीडी, ऑक्स, आयपॉड आणि ब्ल्यूटूथ जोडता येईल. याशिवाय यात ऑटोमॅटिक एसी, टिल्ट ऍडजस्टेबल स्टीयरिंग, मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले तसेच स्टीयरिंग माऊंटेड ऑडियो कंट्रोल्स देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने डी-मॅक्स व्ही-क्रॉसमध्ये डय़ुअल फ्रंट एअरबॅग्ससह एबीएस, ईबीडी आणि ब्रेक असिस्टसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

Leave a Comment