एकाच महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सलग दुसरी वाढ

petrol-disel
नवी दिल्ली- पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये एकाच महिन्यात सलग दुसरी वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ८३ पैशांनी तर डिझेलची किंमत १.२६ रुपयांनी वाढली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झाली आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच पेट्रोल १.०६ रुपयांनी वाढले होते तर डिझेलची किंमत २.९४ रुपयांनी वाढली होती.

Leave a Comment