अमेरिकेत रोबो वकील कार्यरत

lawyer
आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबो अमेरिकेतील एका कायदा फर्मने वकील म्हणून वापरण्यास सुरवात केली असून हा जगातला पहिला रोबो वकील ठरला आहे. रॉस नावाचा हा रोबो आयबीएमने तयार केला आहे. बेकरहॉस्टलर या कॉग्निझंट काँम्प्युटिंग व नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगच्या मदतीने कायदेविषयक कामे करणार्‍या कंपनीत हा रोबो तैनात करण्यात आला आहे. या फर्ममधील टीम कायद्याशी संबंधित संशोधनात या रोबोचा वापर करत आहे.

ही टीम कायद्यातील जी माहिती संशोधित करणे आवश्यक असेल त्या संदर्भात या रोबेाला प्रश्न विचारते. रोबो संबंधित कायद्याचा अभ्यास करून पुराव्यासह आवश्यक माहिती पुरवितो इतकेच नव्हे तर कोर्टाचे या संदर्भातले केस वर प्रभाव पाडू शकतील असे कांही निकाल असतील तर त्याचीही माहिती देतो तसेच त्या संदर्भातल्या कायदेशीर बाबींवर चोवीस तास नजर ठेवतो. या कंपनीने बँकरप्टर्स, रिस्ट्रक्चरींग व क्रेडीटर्स राईटस टीममध्ये वापरासाठी या रोबोला परवाना दिला आहे.

Leave a Comment