डेनिम ड्रेसिंगने दिसा स्टायलीश

jeans
स्टाईलची चर्चा सुरू झाली की ती फॅशनेबल हवी हा मुद्दा गृहीत असतो आणि यात डेनिम जिन्सचा समावेश असतोच असतो. उन्हाळ्याच्या दिवसांतही डेनिम तुम्हाला खास लूक देऊ शकते मात्र त्यासाठी फॅशनच्या जगात सध्या काय चाललेय, लेटेस्ट ट्रेंड कोणते याची थोडी माहिती किंवा गृहपाठ करायला हवा. यामुळे तुमचा स्टाईल सेन्स अपग्रेड व्हायला मदत होतेच आणि जिन्स खरेदी करताना तशी काळजी घेतली जाते. परिणामी स्टाइलीश दिसतानाच मित्रवर्गात इंप्रे मारता येते. एक लक्षात ठेवायला हवे म्हणजे डेनिम खरेदी करताना केवळ ब्रँड आणि फिटींग पाहून चालणार नाही तर ती कम्फर्टेबल आणि स्टायलीशही हवी. आपल्या माहितीसाठी डेनिम्सचे हे कांही खास प्रकार

बॉयफ्रेंड जीन्स- ही लूज फिटिंगची जिन्स दिसते स्ट्रेस जीन्ससारखी. कॅज्युअल व फंकी लूकसाठी मुली ती घोट्याच्यावर दुमडून घालतात. आपला बांधा सडपातळ असेल तर डार्कशेड व डिस्ट्रेस्ड बॉयफ्रेंड जिन्स जरूर खरेदी करा. लाईट शेड खरेदी केली तर हिप्स आणखी फ्लॅट दिसण्याचा धोका असतो. यावर प्लेन गंजी, जॅकेट शेाभून दिसते.

स्की्न फिट जीन्स- या जीन्सची लांबी हिप्स पासून पायांच्या घोट्यापर्यंत असते, स्कीन फिट जीन्स महिला वर्गात जास्त लोकप्रिय आहेतच पण त्या सर्वसाधारण पणे कुणालाही शोभून दिसतात. शर्ट कुर्ती बरोबर त्यांची जोडी मस्त जमते. बांधा थोडा जाड असेल व जाडी लपवायची असेल तर या प्रकारच्या जीन्स हा स्टाइलीश दिसण्यासाठी मस्त ऑप्शन आहेत.

jeans1

बूटकट जीन्स- हिप ते अॅंकल पर्यंत लांबीची ही जीन्स फिटिंगला थोडी सैल व घोट्याजवळ रूंद असते. प्रवासादरम्यान या जीन्स अत्यंत आरामदायी असतात शिवाय स्टायलीश दिसतात.

स्ट्रेट लेग- यालाच सिगरेट लेग जीन्स म्हणून ओळखले जाते. दिसायला या जीन्स स्कीनी जीन्ससारख्याच असतात मात्र घोट्याखाली फिटींग नसते. उन्हाळ्यात या जीन्स वापरायला अतिशय सोयीच्या. कारण स्ट्रेट लेग फिटींगमुळे त्या घामाने पायाला चिकटत नाहीत.

फ्लेअर्ड जीन्स- फार पूर्वी बेलबॉटम पँट नावाची फॅशन होती त्याच पठडीतल्या या जीन्स आहेत. गुडघ्याच्या खाली या सैल असतात. उन्हाळ्यात डार्क शेड फ्लेअर्ड जीन्स गंजीसह चांगला फॅशनेबल लूक देतात.

हायवेस्ट जीन्स- या जीन्सची लांबी कमरेपासून नव्हे तर बेंबीपासून सुरू होते. आपल्या बारीक कमरेचे सौदर्य दाखवायचे असेल तर हा चांगला ऑप्शन आहे. क्रॉप टॉपसह या जीन्स ट्रेंडी लूक देतात. त्याउलट लो वेस्ट जीन्स. हिप्सपासून त्यांची लांबी सुरू होते.९० च्या दशकांत यांची मोठी क्रेझ होती मात्र पालकवर्गाला या जीन्स मुलींनी घातलेल्या फारशा आवडत नाहीत हेही तितकेच खरे.

Leave a Comment