गेटवे- चालकरहित पहिली सार्वजनिक गाडी

ateway
युकेत पहिल्यावहिल्या सार्वजनिक गाडीच्या चाचण्या सुरू झाल्या असून ही सार्वजनिक गाडी चालकरहित आहे. गेटवे असे या प्रकल्पाचे नामकरण करण्यात आले आहे. या ट्रायल्ससाठी सर्वसामान्य नागरिकांनाच नोंदणी करण्याचे आवाहन केले गेले आहे. या यादीत शॉर्टलिस्ट झालेल्यांना गेटवे मधून सफर करण्याची संधी दिली जाणार आहे. त्यांचे अनुभव लक्षात घेऊन त्यात आवश्यक सुधारणा करण्यात येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ग्रिनीच ऑटोमेटेड ट्रान्स्पोर्ट इन्व्हीरॉनमेंट प्रोजेक्ट (गेट वे) साठी ८ दशलक्ष पौंड म्हणजे ७७ कोटी रूपये खर्च केला जात आहे. या वाहनाची ही पहिलीच पब्लीक ट्रायल आहे. ब्रिटनचे रहिवासी हे वाहन स्वीकारतील काय हे यातून जाणून घेतले जाणार आहे. लोकांच्या अनुभवावरून पुढील योजना ठरविली जाणार आहे. वर्षअखेर ग्रिनिचमध्ये ही वाहने चालविली जाणार आहेत. या वाहनात एकावेळी सहा प्रवासी बसू शकतात. वाहनाबरोबर एक सहाय्यक कायम राहणार आहे.

Leave a Comment