इस्रोने बनवले भारतीय बनावटीचे अवकाशयान

isro
तिरुअनंतपुरम : आपल्या आजवरच्या संशोधनात्मक इतिहासातील पहिलेच संपूर्ण भारतीय बनावटीचे अंतराळ यान भारताच्या अवकाश संशोधन संघटनेने (इस्रो) विकसित केले असून उड्डाणासाठी हे यान सज्ज होण्याच्या अंतिम टप्प्यात आलेले आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी या यानाचे नाव आरएलव्ही-टीडी अर्थात ‘रीयुसेबल लाँच व्हेईकल-टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर’ असे आहे. आजवर विविध देशांच्या सहकार्यातून आपले संशोधनात्मक प्रकल्प प्रत्यक्षात उतरविणा-या इस्रोने शंभर टक्के भारतीय बनावटीचे अंतराळ यान विकसित करून आपल्या संशोधन क्षेत्रातील पंख जागतिक स्तरावर विस्तारण्याची बहुमोल कामगिरी केलेली आहे.

पाश्चिमात्त्य अवकाश संशोधन संस्थांसाठी ही खरोखरीच आश्चर्यचकित करणारी बाब ठरणार आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांना नियोजित असणा-या प्रक्रिया यशस्वी रीत्या पार पडल्या तर येत्या जून महिन्यातच आंध्र प्रदेशला लागून असलेल्या बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीवरील श्रीहरिकोटा येथील अवकाशयान प्रक्षेपण केंद्रातून संपूर्ण भारतीय बनावटीच्या आरएलव्ही-टीडीचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. मात्र असा प्रयोग करताना त्याला समुद्रापासून दूर ठेवण्याची काळजी घेतली जाईल.

कारण या अवकाशयानाचे विघटन होण्याची शक्यता असून त्याच्या रचनेत पाण्यावर तरंगण्याची सुविधा अद्याप विकसित करण्यात आलेली नाही. बंगालच्या उपसागरापासून सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर त्याच्या ध्वनीच्या वेगापेक्षा पाच पट अधिक वेगातील स्थैर्याची चाचणी केली जाणार आहे. प्रायोगिक चाचणीसाठी अमेरिकन अवकाशयानासारख्या दिसणा-या आरएलव्ही-टीडीचा आकार त्याच्या प्रत्यक्षातील आकारापेक्षा सहा पटीने कमी ठेवण्यात आलेला आहे. ६.५ मीटर लांबीच्या विमानासारखे दिसणा-या यानाचे वजन सुमारे १.७५ टन असून एका रॉकेट बुस्टरमार्फत ते अवकाशात सोडले जाणार आहे.

Leave a Comment