आईनस्टाईनचा सापेक्षतावाद इतरत्रही लागू

einstine
टोकिओ : प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आईनस्टाईन याचा सापेक्षतावादाचा सिद्धांत आपल्या संपूर्ण विश्वात इतरत्रही खरा ठरला असल्याचा दावा जपानी संशोधकांनी केला आहे. आईनस्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांताची शताब्दी साजरी होत असताना गुरुत्वीय लहरींच्या अस्तित्वानंतर आईनस्टाईनच्या सैद्धांतिक संशोधनावर शिक्कामोर्तब होण्याची ही या वर्षातील दुसरी वेळ आहे.

वैज्ञानिकांनी तीन हजार दीर्घिकांचा त्रिमिती नकाशा तयार केला असून या दीर्घिका पृथ्वीपासून १३ अब्ज प्रकाशवर्षे दूर आहेत. आईनस्टाईनचा सामान्य सापेक्षतावाद सिद्धांत हा विश्वात सर्वदूर खरा ठरताना दिसत आहे. विश्व प्रसरण पावत आहे याचा शोध १९९० मध्ये लागल्यानंतर नेमके हे प्रसरण का होते आहे, याचा उलगडा होत नव्हता. विश्वाच्या प्रसरणामागे कृष्ण ऊर्जा असावी किंवा आईनस्टाईनचा सामान्य सापेक्षतावादाचा सिद्धांत असावा असे मानले जाते. गुरुत्व अवकाश व काळाच्या मितीत प्रवास करताना तुटत नाही तर वाकते.आईनस्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत पडताळण्यासाठी कावली इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स अ‍ॅण्ड मॅथेमेटिक्स व जपानचे टोकिओ विद्यापीठ यांनी तीन हजार दूरस्थ दीर्घिकांचा वेग व सामूहिकरणाचा अभ्यास केला. त्यात आईनस्टाईनचे म्हणणे बरोबर सिद्ध झाले आहे. विश्वात अगदी दूरवरही सापेक्षतावादाचा सिद्धांत लागू पडतो. त्यामुळे विश्वाचे प्रसरण होते आहे व त्याचे स्पष्टीकरण वैश्विक स्थिरांकाच्या माध्यमातून करता येईल.

सापेक्षतावादाच्या सिद्धांतात आईनस्टाईनने वैश्विक स्थिरांक ही संकल्पना मांडली होती. आजपर्यंत कुणी केली नव्हती, अशी सापेक्षतावादाची चाचणी आम्ही घेतली आहे व या सिद्धांताच्या शतकपूर्ती निमित्ताने हे मोठे यश आहे, असे कावली आयपीएमयूचे संशोधक टेप्पेई ओकुमुरा यांनी सांगितले आहे. विश्वात अगदी दूरवर सामान्य सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा पडताळा घेण्यासाठी बारा वर्षांपूर्वी हा प्रयोग सुरू केला होता. आज त्याचे निष्कर्ष हाती आले आहेत, असे स्वीनबर्न तंत्रज्ञान विद्यापीठाचे कार्ल ग्लेझब्रुक यांनी सांगितले. आजपर्यंत कुणीही आपल्यापासून १० अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या दीर्घिकांना सापेक्षतावादाचा सिद्धांत लागू करून पाहण्याचा प्रयत्न केला नव्हता, पण आम्ही तोकेला त्यात एमएमओएस म्हणजे फायबर मल्टी ऑब्जेक्ट स्पेक्टड्ढोग्राफ या सुबारू टेलीस्कोपवरील यंत्रणेचा उपयोग १२.४ ते १४.७ अब्ज प्रकाशवर्षे दूर असलेल्या दीर्घिकांचे विश्लेषण करण्यासाठी झाला आहे.

Leave a Comment