तुमचे ड्रायव्हिंग लायसन्सही होणार डिजिटल

app
नवी दिल्ली – केंद्र सरकार सध्या डिजिटल इंडिया योजनेवर भर देत असून या योजनेनुसार नव-नवे अॅप आणि सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यात येत आहेत. टेक्नोलॉजी सोबत नागरिकांना जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठीच आता सरकारने आणखीन एक पाऊल उचलले आहे. याअंतर्गत आता तुमचे ड्रायव्हिंग लायसन्सही डिजिटल होणार आहे.

लवकरच एक ‘एम-परिवहन’ नावाचे अॅप डेव्हलप नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर करणार आहे. म्हणजेच आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसेंस, रजिस्ट्रेशन पेपर आणि पीयूसीची हार्ड कॉपी सोबत बाळगण्याची गरज पडणार नाही. या अॅपच्या मदतीने तुम्ही तुमच्या प्रत्येक गरजेच्या कागदपत्रांची डिजिटल कॉप सांभाळून ठेऊ शकता.

एम डिजीटल अॅप च्या माध्यमातून तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन पेपर्स, इन्शुरन्स पेपर आणि पीयूसी सर्टिफिकेट स्कॅन करुन त्याची कॉपी तुमच्या स्मार्टफोनमध्ये ठेवू शकता. हे अॅप देशभरामध्ये मान्य असेल. ज्या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रांची मागणी केली जाईल त्या ठिकाणी ही डिजिटल कॉपी मान्य करण्यात येईल.

डिजिटल लायसन्स सुविधा तेलंगणा राज्यामध्ये यापूर्वीच सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी तेलंगणा सरकारने ‘आरटीए-एम वॉलेट’ हे अॅप लॉन्च केले आहे. हे अॅप लॉन्च केल्यानंतर एका महिन्यातच जवळपास ६ लाख नागरिकांनी हे अॅप डाऊनलोडही केले आहे. हे अॅप उएनआयसी तर्फे येत्या सहा महिन्यांमध्ये पलब्ध करण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. या अॅपच्या मदतीने तुम्ही तुमचे लायसन्सही रिन्यू करू शकता.

Leave a Comment