एअरपोर्ट? नव्हे, बसस्टँड- तोही भारतातला

badoda
बडोदा – सरकारी बसस्टँड म्हटल्यानंतर एक सर्वसाधारण चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. जागोजाग कचर्‍यांचे ढिग, पान तंबाखूच्या पिचकार्‍या, भिकारी, मोडकी बाके, अस्वच्छ स्वच्छतागृहे आणि एकूण कोलाहलाचे वातावरण हे भारतातील कोणत्याही बसस्टँडचे दिसणारे चित्र. मात्र त्याला पूर्ण छेद देणारा बसस्टँड गुजराथच्या बडोदा येथे उभारला गेला आहे. प्रथमदर्शनी चकाचक एअरपोर्ट अथवा फाईव्ह स्टार हॉटेलचा भास या बसस्टँडवर गेल्यावर होतो.

हा बसस्टँड उभारण्यासाठी तब्बल ११० कोटी रूपये खर्च केले आहेत. दररोज १५२४ बस या स्टँडवरून येजा करतात आणि येथे दररोज किमान ४५ हजार प्रवासी त्याचा वापर करतात. अडीच लाख चौरस फूट जागेत उभारलेल्या या स्टँडची स्वच्छता खासगी कंपनीकडे सोपविली गेली आहे. ही कंपनी ३१ वर्षांसाठी ही देखभाल करणार आहे.त्यासाठी येथील हॉटेल्स, जाहिराती व दुकानांच्या भाड्यातून मिळणारा पैसा वापरला जातो. तसेच ५० डिलक्स वेटिंग रूम्स, मोठी एसी वेटिंग रूम, सामानासाठी ट्राॅलीज, व्हिलचेअर्स, सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र ब्लॉकरूम आहेतच पण रात्री मुक्कामाची वेळ आली तर प्रवासी भाडे भरून झोपण्यासाठी रूम्स घेऊ शकतात.

Leave a Comment