इंस्टाग्रामही झाले ‘सैराट’

sairat1
मुंबई – ऑनलाइन फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग अॅप इंस्टाग्रामने आपला लोगो बदलला असून तसेच आपले डिझाईनलाही नव्या रुपात सादर केले आहे. इंस्टाग्रामचा आयकॉन हा पुर्वी पेक्षा अधिक रंगीत झाला आहे.

सध्या ‘सैराट’ चित्रपटाचा फिव्हर राज्यात, देशातच नाही तर परदेशातही पहायला मिळत आहे. इंस्टाग्रामने आपला लोगो बदलला असुन या लोगोमध्ये वापरण्यात आलेला कलर हा सैराट चित्रपटातील पोस्टर्सवर वापरण्यात आलेल्या कलर्सशी मिळता जुळता आहे. सैराट चित्रपटाच्या पोस्टर्सवर वापरण्यात आलेल्या कलर्ससारखाच इंस्टाग्रामच्या नव्या लोगोचा कलर हा असल्याने ‘सैराट’ चित्रपट पाहून इंस्टाग्रामही ‘झिंगाट’ झाला असल्याची चर्चा सोशल मीडियात होत आहे.

instagram

इंस्टाग्राम तर्फे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगण्यात आले आहे की, लोगो कलरफूल बनविण्यात आला आहे, कारण यामुळे युझर्स इंस्टाग्राम अॅप कडे आकर्षित होतील. या रिडिझाईनिंगमुळे अॅपच्या वापरामध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. या पुर्वी इंस्टाग्रामच्या लोगोमध्ये कॅमेरा (विंटेज कॅमेरा) चा आयकॉन होता. २०१० मध्ये लाँच करण्यात आलेला इंस्टाग्राम सोशल मीडियामध्ये प्रचंड प्रसिद्ध आहे. इंस्टाग्राम तरुण, क्रिकेटर्स आणि सिलेब्रेटींमध्ये फार लोकप्रिय आहे.

इंस्टाग्राम सोबतच आपले Layout, Hyperlapse, Boomerang हे तीन अॅप्सही अपग्रेड केले आहेत. या पुर्वीही इंस्टाग्रामने आपल्या अॅपमध्ये नवी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मार्च महिन्यामध्ये सुरु करण्यात आलेल्या या नव्या सुविधेमुळे ६० सेकंदांचा व्हिडिओही पोस्ट करण्याचा पर्याय युझर्सला देण्यात आला आहे.

Leave a Comment