१ जूनपासून महागणार हॉटेलिंगसह फोनबिल, रेल्वे व विमान प्रवास

service-tax
नवी दिल्ली- देशातील जनतेला येत्या १ जूनपासून अतिरिक्त आर्थिक भुरर्दंड बसणार आहे. १४.५ टक्के सेवाकरासोबत (सर्व्हिस टॅक्स) ०.५ टक्के कृषी कल्याण सेवा उपकर अर्थात सेस अतिरिक्त आकारण्यात येणार आहे. या संदर्भात केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा झाली होती. सर्व्हिस टॅक्स वाढल्याने सर्वप्रकारच्या सुविधा महागणार आहेत. त्यात हॉटेलिंग, फोनबिल, रेल्वे व विमान प्रवास सारख्या सुविधांचा समावेश आहे.

सेवाकरात एक जूनपासून ०.५ टक्के कृषी कल्याण सेवा उपकर आकारणी होणार असल्याने सर्वच प्रकारच्या सेवा महागणार असून ग्राहकांवर अतिरिक्त भुरर्दंड पडणार आहे. बुधवारी राज्यसभेत वित्त विधेयक मंजुर झाल्याने सर्व्हिस टॅक्स वाढीव दराने लागू करण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Leave a Comment