बुगातीची सुपरफास्ट, सुपर महाग, सुपरकार चिरॉन

bugati
फॉक्सवॅगन ग्रुपच्या फ्रेंच कारमेकर बुगातीने चिरॉन नावाने जगातील सर्वाधिक वेगवान, सर्वाधिक महागडी सुपरकार सादर केली असून ही कार दिल्ली मुंबई अंतर अवघ्या अडीच तासात पार करेल असे समजते. जिनेव्हा मोटर शो मध्ये बुगातीने ही सुपरकार सादर केली होती. तिचा टॉप स्पीड आहे ताशी ४२० किमी आणि ० ते १०० किमीचा वेग ती अवघ्या २.४ सेकंदात गाठते. या कारच्या स्पीडोमीटरचा टॉपस्पीड ताशी ५०० किमीचा आहे. अडचण एकच आहे की या वेगाने कार पळविता येईल असे रस्तेच सध्या तरी फारच कमी प्रमाणात आहेत.

ही कार जगातील महागडी सुपरकारही आहे. या न्यूजनरेशन कारची बेस प्राईज २६ लाख डॉलर्स म्हणजे १७ कोटी रूपये आहे. कंपनीचे प्रेसिडेंट वॉल्फगाँग डुरेइमन यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सर्वोत्तम ते बनविण्याचा प्रयत्न केला आहे. या कारचे वजन २ हजार किलो असून ही पहिली १५०० एचपी स्पोर्टसकार आहे. कारची बॉडी कार्बन फायबरपासून बनविली गेली आहे व त्याला ८.० क्वाड टर्बोचार्ज व्ही १६ इंजिन दिले गेले आहे. हे इंजिन कंपनीने स्वतःच विकसित केले आहे. त्याला सेव्हन स्पीड ऑटो ट्रान्समिशन दिले गेले आहे. ही टू डोर कुपे कार असून अशा फक्त ५०० कार कंपनी बनविणार आहे. त्याती १७० गाड्यांसाठी अगोदरच नोंदणी झाली असून कारची डिलिव्हरी २०१६ अखेरी दिली जाणार आहे.

Leave a Comment