बहुराष्ट्रीय कंपन्यांना शीर्षासन करायला लावणार रामदेवबाबा

ramdev
उज्जैन – स्वदेशीचा जागर करण्यासाठी उज्जैन येथे शुक्रवारी कृषी व कुटीर कुंभ मेळ्यात दाखल झालेल्या योगगुरू रामदेवबाबांनी येत्या तीन ते पाच वर्षात सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांना शीर्षासन करायला लावून भारताबाहेरचा रस्ता दाखविणार असल्याची घोषणा केली आहे. मध्यप्रदेशात पतंजली तर्फे जगातल्या सर्वात मोठ्या अन्नप्रक्रिया उद्योगाच्या प्रकल्पाची घोषणाही त्यांनी यावेळी केली. यावेळीच पतंजली संस्थानतर्फे ५०० कोटी रूपये खर्चून गो अनुसंधान केंद्रासाठी मदत केली जाणार असल्याचेही रामदेवबाबा यांनी सांगितले.

या मेळ्यात पतंजलीचे ब्रँडींग करताना रामदेवबाबा म्हणाले, देशातील शेतकरी समृद्ध झाला पाहिजे आणि कुटीरोद्योग शिखरावर गेला पाहिजे. त्यासाठी स्वदेशी वापरावर भर दिला गेला पाहिजे. यावेळी रामदेवबाबांनी हातमाग कापडाचेच कपडे ते वापरणार असल्याची शपथही घेतली. ते म्हणाले भारतात परदेशी कंपन्या प्रचंड कमाई करून देशाला लुटत आहेत. त्यांना भारताबाहेर काढणे हे आमचे ध्येय आहे.

Leave a Comment